केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत नंदकुमार तेलंगे रायगड मध्ये प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण!  

  कोलाड :(विश्वास निकम) रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंदशाळा कोलाड येथे कार्यरत असणारे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख )विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.

           ३ जानेवारी २०२६ रोजी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख )विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.याचा निकाल १४ मार्च २०२६ लागला असुन प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री )राजिप केंद्रशाळा कोलाड येथील शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा  परीक्षेत २०० पैकी १६९गुण प्राप्त करून रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

          या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून ४६०६८ जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते यापैकी ३८५५८ जणांनी परीक्षा दिली यामध्ये नंदकुमार तेलंगे रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंदकुमार तेलंगे हे हेटवणे सारख्या खेडेगावातील असुन त्यांचे माध्यमिक शिक्षण कोलाड हायस्कूल येथे झाले असुन सध्या ते कोलाड केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत झटणारे म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकत आहेत.त्यांच्या यशा बद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog