Posts

Showing posts from June, 2025
Image
  विजेचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू! जिंदाल कॉलनी सुकेळी येथील नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील घटना!   सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली घटनास्थळी धाव!     कोलाड (विश्वास निकम) रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गत असणार्‍याहून नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येअसणाऱ्या  सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटल जवळ असणाऱ्या  कॉलनीच्या आवारात खेळत असलेल्या मुलाला विजेचा खांबाचा शॉक लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत मानव कुमार मुकेश पवार वय वर्षे १३ रा. जिंदाल हॉस्पिटल कॉलनी सुकेली, मूळ गाव फतेहपूर ( राजस्थान) याचा मृत्यू झाला असुन या घटनेमुळे सुकेली परिसरात शोककळा पसरली आहे.   याच विजेच्या खांबाचा शॉक लागून दुर्दैवी 13वर्षीय मुलाचा अंत झाला. हे दाखविताना सामाजिक कार्यकर्ते दिनेश कातकरी व सतीश सुटे, प्राप्त झालेल्या माहिती नुसार मानव कुमार हा १३ वर्षाचा मुलगा जिंदाल हॉस्पिटल कॉलनीच्या बाहेर असलेल्या मैदानात कॉलनीतील इतर मुलांच्या सोबत खेळत होता.खेळताना त्यांच...
Image
  गुरूकडून ज्ञान वडीलांकडून  संघर्ष आईकडून संस्कार शिकलो म्हणून 39 वर्षात निष्कलंक सेवा करू शकलो:-उपनिरीक्षक राम पवार    सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी  रायगड :-(ओम पवार) पोलीस खात्यामध्ये 39 वर्षे सेवा करताना खूप अडचणी आल्या मात्र मागे हटलो नाही गुरूकडून ज्ञान,वडिलांकडून संघर्ष व आई कडून मिळालेले संस्कार व पत्नीने दिलेली साथ  या शिदोरीमुळेच पोलीस खात्यात 39 वर्षे निष्कलंकपणे सेवा करू शकलो असे प्रतिपादन  सुधागड पाली पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त कार्यतत्व कर्तव्यदक्ष व लोकप्रिय सेवानिवृत्त उपनिरीक्षक राम मारुती पवार यांनी काढले ते सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की 39 वर्षात खूप काही शिकलो तुमच्या समाजाच्या सहकार्यामुळे 39 वर्षाच्या प्रवासात पुढे जाऊ शकलो आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा ही आपल्यासारख्या स्नेहांमुळेच मिळाली तुमचे सहकाऱ्यांचे, समाजाचे ऋण शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. मी जरी  सेवानिवृत्त झालो असले तरी यापुढे सुद्धा अखंड समाजाची सेवा करण्याची अभिवाचन सेवानिवृत्त...
Image
रोहा तालुक्यातील घटना!   मुंबई गोवा महामार्गावर फॉर्च्युनर कारची एसटी बसला जोरदार धडक, दोनजण जखमी,खांब गावानजिक घडला अपघात    कोलाड (विश्वास निकम) मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक रविवारी १ जून रोजी फॉर्च्यूनर कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एसटी बसचा देखील मोठ्या प्राणावर नुकसान झाले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे तर एसटी बस क्रमांक एम एच ०८ ए पी ५८२५ वरील चालक संतोष काशीराम बुधकर वय वर्षे (४०) हे ही बस प्रवासी घेऊन मुंबई च्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते तर संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच ०६ बी यू ९९३६ हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून  मुंबई कडे जात असतांना कारवरील ताबा सुटल्याने  समोरील एसटी बसवर धडकल्याने संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर ज...