Posts

Image
तळा पूसाटी, जोगवाडीला स्थलांतरिताच्या नोटीसा!  सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाच्या सूचना!        तळा (कृष्णा भोसले) तळा पुसाटी, जोगवाडीला दरडग्रस्त धोका असल्याने जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केल्याने  या गावात दि. 20 जुलै रोजी तहसीलदार तळा, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक तळा,विस्तार अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी तळा, मुख्याधिकारी नगरपंचायत तळा नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक  नगरपंचायत,यांनी मौजे तळा येथील पूसाटी व जोगवाडी या संभाव्य दरड ग्रस्त गावात उपस्थित राहून सर्व नागरिकांना/ग्रामस्थांना सूचना दिल्या. तसेच राधाकृष्ण मंदिर वरचा हॉल,कुणबी समाज सभागृह,चंडिका मंदिर सभागृह,गो.म.वेदक कॉलेज,गणेश मंगल कार्यालय हॉल येथे स्थलांतरीत होनेचे आदेश व आवाहन केले.ग्रामस्थांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन स्थलांतर होणेचे कबूल केलेआहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे . 
Image
  घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोप पावलेली चतुर्भुज विरगळाचे शिवऊर्जा मित्र मंडळाने केले पुनर्वसन!   इतिहासाला उजाळा देण्याचे शिवऊर्जा मित्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य!   रोहा (राजेश हजारे) आपला इतिहास हा वास्तूचे रूपात जिवंत असतो तो कायम टिकवा त्याकरीता पुरातत्त्व विभाग काम करत आहे पण आपल्या  दैदीप्यमान इतिहास आहे तो जिवंत राहावा पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी  म्हणून माझी भारतीय नागरिक म्हणून माझे काहीतरी कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि याच भावनेतून इतिहास जिवंत राहावा कायम टिकावा यासाठी शिव ऊर्जा मित्र मंडळ  गेली अनेक वर्ष झटत आहे.  नुकतेच घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोक पावलेली चतुर्भुज  विरगळाची शिव ऊर्जा मित्र मंडळांनी पुनर्वसन केले असून या कामगिरीने संबंध रायगड जिल्ह्यातून शिव ऊर्जा मित्र मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वराज्याचा साक्षीदार असलेला घोसाळगड ऊर्फ विरगडाच्या पायथ्यालगत गावाबाहेर शिवमंदिर आहे  या शिवमंदिरा जवळच दोन पुरातन विहीरी व तलाव आहे त्याची पहाणी करीत असताना चौकोनी पु...
Image
  पुण्यातील शिवराय आर्ट ला शिवप्रेमींची पाठीवर कौतुकाची थाप! स्वराज्याचा विठ्ठलाने त्या पायरीवर पाय ठेवावा, अन् चरणधुळीने माझ्या नावावर सदैव अभिषेक व्हावा एवढीच इच्छा! रायगड (राजेश हजारे, भिवा पवार ) ध्येय ऊराशी ठेवुन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करणारे स्वराज्याचे रायगड बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर यांच्याविषयी प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आदर असतो. इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. स्वराज्याच्या संबधीत बोलका इतिहास शिलालेखातुन आपल्या पर्यंत पोहचत असतो. असाच एक इतिहासातील भाग म्हणजे दुर्ग दुर्गेश्वर रायगड वरील केलेले बांधकाम जोवर चंद्र सुर्य नांदतील तोवर ह्या गडाचे बांधकाम अबाधित राहील असे ठामपणे सांगणारे स्वराज्यातील दुर्ग बांधकाम सिव्हिल इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांची स्वराज्यापायी असणारी निष्ठा ही गडावरील पायरीच्या शिलालेखातुन समजते. "तो नुसता पायरीचा दगड नसुन स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेचा, स्वाभिमानाचा पायरीचा  दगड आहे" तो घराघरात पोहचला पाहीजे असे मनात विचार करुन शिवसमाधीला नतमस्तक होवुन शिवरायांचे आशिर्वाद घेतले आणी पुण्यातील शि...
Image
  शिवऊर्जा मित्र मंडळाची प्लॅस्टिक मुक्त घोसाळगड स्वच्छता मोहीम! उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!   रोहा: (राजेश हजारे) मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये घोसाळगडाला असंख्य पर्यटकांची भटकंती सुरु असुन गडावर जाणाऱ्यांची संख्या शेकड्यात आहे. पण, आजचा रविवार घोसाळगड साठी हटके ठरला. प्लास्टिक कचऱ्याने वेढलेल्या घोसाळगडावरील खिंड दरवाजा तसेच घोड्याची पागा ह्या परीसराने रविवारी मोकळा श्वास घेतला.  सकाळ पासूनच मंडळाच्या सदस्यांनी तिन तासात सुमारे पाच बॅगा प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच बियरचे टिन हे एकत्र संकलीत केले. घोसाळगडाच्या खिंड दरवाजाच्या पायथ्याला सकाळी सात वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. खिंड दरवाजा व घोड्याचा पागा अशा दोन भागात ही मोहीम राबविण्यात आली. पायवाटेवर, झुडुपांमध्ये कुठेही फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे या वेळी उचलण्यात आली. पायथ्याला पाच पोती भरून प्लास्टिक जमा झाले. मंडळातील सदस्यांनी व लहान मुलांनी गडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कचरा गोळा केला. हा गड शिलाहार काळापासून वैभवाच्या खुणा जपत आहे कातळात कोरलेल्या सरळ पायऱ्या व गनिमांना चकवा देणारा खिं...
Image
  सासू सुनेचा योगायोगाने एकाच दिवशी उत्साही वातावणात वाढदिवस साजरा   कोलाड (विश्वास निकम,रायगड भुषण )  चिल्हे गावातील सुनंदा गोविंद महाडिक यांचा ८० वा तर त्यांची सुन नेहा नथुराम महाडिक यांचा ४४ वा वाढदिवस मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सासू सुनेचा वाढदिवस एकाच दिवशी येणे केवळ योगायोग असून असे क्वचितच घडू शकतो.     सुनंदा महाडिक या वयाच्या ८० वर्षी ही विविध प्रकारची कामे उत्तम प्रकारे करीत असून तरुण वयात त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या एक मुलगा व एक मुलगी यांचा मोठया मेहनतीने सांभाळ केला.परंतु त्यांच्या मुलीचे ही लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षातच  मुलीला एक मुलगी व एक मुलगा झाल्यानंतर तरुण वयात मुलीचा ही मृत्यू झाला.परंतु त्यांनी सर्व दुःख विसरून न डगमगता नात व नातू यांना मोठे केले.व मुलाचे ही लग्न केले.      अशीच सर्व दुःख पाठीशी घालत मुला मुली नंतर नातवंडे यांचा उत्तम प्रकारे सांभाळ करणारी सुनंदा यांचा वाढदिवस साजरा करतांना आमची बय मायाळू,आमची बय सुगरण,आमची बय सोज्वळ,आमची बय कडक, आमची बय कर्तव्य दक्ष,आमची बय शिस्त प्रिय,आ...
Image
  पत्रकार समीर बामुगडे यांना पितृशोक!   रोहा:(प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील निवी येथील जेष्ठ आदर्श शेतकरी रामा रामजी बामुगडे यांचे गुरुवारी 27 एप्रिल रोजी अकस्मात निधन झाले मृत्यु समयी ते 89 वर्षाचे होते  प्रेस संपादक व पत्रकार सेवासघाचे माजी कोकण उपाध्यक्ष समीर बामुगडे आणि दिलीप बामुगडे ,विठ्ठल बामुगडे, संतोष बामुगडे यांचे ते वडील  होत,   स्व,रामा बामुगडे यांच्या पश्चात त्यांच्या मुले सुना नातवंडे तसेच भावकी परिवार आहे त्यानी शून्यातून विश्व निर्माण करुन निवी गावात त्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता,तसेच रामा बामुगडे यानी निवी ग्रामस्थांचा 25 वर्ष खजिनदार पदाची जबाबदारी सभाळली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवी  येथील त्यांच्या निवास्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन घेऊन बामुगडे परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवरांसह उपस्थित होते  त्याचे दशक्रियाविधी शनिवार दि 6/5/2023रोजी महादेव मंदिर येथे होणार असून तर उत्तरकार्य रविवारी दि7/5/2023मे रोजी निवी येथील निवासस्थानी होणार आहेत,
Image
  आम्ही गिरगांवकर"आणि ''श्री रविप्रभा मित्र संस्था" रायगड यांनी संयुक्तपणे केली जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी! साई /माणगांव (हरेश मोरे ) "आम्ही गिरगावकर" टीम पुरस्कृत'रंग दे माझी शाळा' हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही गिरगावकर टीम आणि श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड संयुक्तपणे शनिवार, दि.२२ एप्रिल २०२३ रोजी आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलींद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नाईक यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा इमारती व स्वच्छता गृहांची पाहणी केली. राज्यात अनेक जिल्ह्यातील तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची व स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सोयीसुविधांबाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'रंग दे माझी शाळा...