जनावरांची योग्य काळजी न घेतल्याने दोन गाई मृत्युमुखी, गुन्हा दाखल, कोलाड पोलीसांचे शेतकरीवर्ग व प्राणी मित्रांकडून अभिनंदन रायगड (भिवा पवार ) एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलिसांकडे दाद मागता येते, न्यायालयात दाद मागता येते. पण मुक्या प्राण्यांवर अन्याय झाला त्यांना निर्दयतेने वागविले त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, तर त्यांनी दाद कोणाकडे मागायची. पण मुक्या प्राण्यांवर अन्याय तर त्यांना न्याय देता येतो हे दाखवून दिले आहे रोहा तालुक्यातील कोलाड पोलिस स्टेशन मधील कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांच्या पथकाने काल 8 ऑक्टोंबर रोजी गुरांना घेऊन जात असताना चालकाकडे वाहतूक परवाना, पशुवैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, चेक रिपोर्ट, असूनही गुरांची योग्य ती काळजी न घेणार्या व गाईंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेतकरीवर्ग व प्राणिप्रेमींनकडून कोलाड पोलिसांचे ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
श्री धाविर महाराज पालखी सोहळा शासनाच्या निर्बंधांनुसार व मास्क सेनेटाईजर लावूनच उत्साहात साजरा करा. खासदार सुनील तटकरे रोहा अष्टमी (नरेश कुशवाहा ) कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्बंधांचे पालन करून व मास्क , सेनेटाईजर लावूनच आपल्या सह कुटुंबीयांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या आणि आपल्या ग्रामदैवत श्री धाविर महाराज पालखी सोहळा उत्साहात साजरा करा असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेला श्री धाविर महाराज पालखी सोहळ्याच्या शांतता कमेटीच्या सभेत केले . सदर सभेत पालक मंत्री आदिती तटकरे , जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर , आमदार अनिकेत तटकरे , जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे ,डी.वाय.यस.पी किरण कुमार सुर्यवंशी, तहसीलदार कविता जाधव, रोहा पोलीस निरीक्षक संजय पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील , श्री धाविर महाराज मंदिर विश्वस्त प्रशांत देशमुख, विजयराव मोरे , लालता प्रसाद कुशवाहा , मकरंद बारटक्के , यशवंत शेडगे , उपनगराध्यक्षा रिदवाना ...
- Get link
- X
- Other Apps
चिंचवली तर्फे दिवाळी येथील भवानी मातेच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ गोवे- कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील गुरुवार दि.७ ऑक्टोबर २०२१ रोजी भवानी मातेचे पूजन करुन नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.चिंचवली तर्फे दिवाळी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणारी भवानी मातेच्या घटस्थापणेसाठी गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ, तरुण तरुणी व महिला वर्ग उपस्थित राहुन अनेक वर्षांपासून भवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठया उत्साही वातावरणात साजरा केला जातो. परंतु गेली दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सर्व सार्वजनिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत.तरी सोशल डिस्टनचा पालन करीत चिंचवली तर्फे दिवाळी येथील महिलांनी उपस्थित राहुन भवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी प्रगती येरुणकर, सायली सावळे,सान्वी विचारे,सिद्धी येरुणकर, शुभांगी मालुसरे, अर्चना येरुणकर, सुजाता येरुणकर, रतिका येरुणकर,तसेच गावातील सर्व महिल...
- Get link
- X
- Other Apps
रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले! कोरोना नियमांचे पालन करीत महाराजांच्या नवरात्रोत्सवास सुरुवात.. कोलाड (श्याम लोखंडे) देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगड वासियांचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज गुरूवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले. कोरोना नियमांचे पालन करीत अतिशय कमी भक्तगणांच्या उपस्थितीत महाराजांच्या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. रोहा शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान तेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असल्याने यंदाही गतवर्षीप्रमाणे अतिशय साध्या पद्धतीने महाराजांचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांची पाळनुक करीत सर्व नियोजन करण्यात आले आहे. हा ...
- Get link
- X
- Other Apps
साई हायस्कूलचे चंद्रकांत आधिकारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित माणगाव (भिवा पवार) शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करत असते.गतवर्षी माणगाव तालुक्यातून साई विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य ज्ञानदिप विद्यामंदिर साई हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.चंद्रकांत आधिकारी सर यांची निवड करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्यावतीने किरवली ,ता.कर्जत येथे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते रा.जि.प.अध्यक्षा योगिता पारधी,शिक्षक आमदार मा.बाळाराम पाटील, समाज कल्याण सभापती गिताताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे ,खेळ व विविध स्पर्धां मध्ये गोडी निर्माण करून विशेष सराव व मार्गदर्शन करून तालुका ,जिल्हा व विभाग स्तरावरील सांघिक व वैयक्तिक खेळात नैपुण्य प्राप्त करू...
- Get link
- X
- Other Apps
आंबेवाडी येथील तानाजी फार्म हाऊसवर चोरट्याने मारला डल्ला ,७००००रु. किंमतीचा माल लंपास (संग्रहीत छायाचित्र ) गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावाच्या हद्दीतील मुंबई-गोवा हायवेवरील रेल्वे ब्रिजच्या लगत असणाऱ्या तानाजी शेडगे फार्म हाऊस वरील बंगल्यावर सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी ७०००० रुपयांचा माल लंपास केला. या बाबत कोलाड पोलिस सूत्रांन कडून मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी गावाच्या हद्दीतील मुंबई गोवा हायवे कोकण रेल्वे ब्रिजच्या लगत असणाऱ्या तानाजी शेडगे यांच्या फार्म हाऊसवरील बंगल्यावरील स्लायडींग खिडकीचे लॉक तोडून त्यावाटे आत शिरून सॅमसंग कंपनीचे ३५००० रुपये किंमतीचे दोन ४० इंचचे दोन एल.ई.डी टीव्ही असे एकूण ७० हजार किंमतीचा माल चोरट्याने लंपास केला असुन याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात पोस्टे गुरनं ००८१/ २०२१ भा.वि.द.क.४५७,३८०,३४प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.एम. आर. गायकवाड सह अधिक तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
कोलाड पोलिसांची धडक कारवाई, छापा टाकून गावठी दारू जप्त गोवे-कोलाड (विश्वास निकम) पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी आंबेवाडी येथील कासा आदिवासी वाडी येथील सोमनाथ सुरेश जाधव वय वर्षे ४० यांच्या घराच्या मागे बांबूच्या बेटा जवळ मोकळ्या जागेवर १० लिटर गावठी दारूचा कॅन छापा टाकून जप्त केलाआहे. या विषयी कोलाड पोस्टे गुरुनं ००८२/२०२१,६५ इतर ६प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा. एन. एस. पाटील,पो.ना.ऐ.बी पाटील, समिर कोकाटे अधिक तपास करीत आहेत.